जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शिवसेनेच्या ५५ वा वर्धापन दिनानिमित्तचे औचित्य साधून जळगाव शिवसेना शहर कार्यालयाची जी दुरवस्था झालेली आहे , ती दुरवस्था दूर करून अद्यावत कार्यालय शिवसैनिकांसाठी उपलब्ध व्हावा म्हणून समस्त शिवसैनिकांनी हा संकल्प केलेला आहे , दुरवस्थेत असलेल कार्यालय अद्यावत व सुविधा मय करण्याचे जळगाव शहरातील शिवसैनिकानी केला आहे.
शिवसेनाप्रमुखांची जे स्वप्न होते लोकांसाठी एक चांगलं काम करता आले पाहिजे व त्यांना तात्काळ मदत करता आली पाहिजे या गोष्टी विचारात घेऊन आधुनिक तंत्रज्ञान च्या माध्यमातून ई-मेल , ऑनलाईन सुविधा, या माध्यमातून लोकांना सोयीने व तात्काळ मदत मिळेल अशा पद्धतीचे अत्याधुनिक प्रशस्त कार्यालयाचे काम मान्य पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब पक्षाचे संपर्क नेते संजय राऊत व समन्वयक रविंद्र मिर्लेकर यांनी या संबंधी आदेश दिले असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच आम्ही आदेशा पासून तीन महिन्या च्या आत चांगलं कार्यालय उभ करू व पक्षा साठी एक चांगला अद्यावत कार्यालय शहरासाठी उभ करून शिवसैनिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
तीन महिन्यात अद्यावत कार्यालय उभारण्यात येईल जेणे करून गोर-गरीब नागरिकांच्या योग्य त्या समस्या सोडवून त्यांना न्याय देता येणार आहे. असा निश्चय शिवसैनिकांनी केलेला आहे याप्रसंगी उपस्थित शिवसेना माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे ,चेतन भाऊ प्रभूदेसाई ,लोकेश पाटील ,राजेंद्र पाटील , राहुल नेतलेकर ,भैय्या वाघ ,विजय चौधरी, दिलीप बारी ,चेतन पाटील ,टिंकू तळरेजा ,अक्षय अहिरराव, बजरंग सपकाळे ,सुनील ठाकूर , धनंजय भोळे, ललित कोतवाल व इतर शिवसैनिक उपस्थित होते .