जळगाव राजमुद्रा | गेल्या काळात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे एक गावचे कट्टर समर्थक असलेले उद्योजक प्रफुल लोढा हे अचानक जळगाव शहरात शिवसेनेच्या कार्यक्रमात दिसून आले, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या दिसून आल्या, मंत्री गिरीश महाजन यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असून त्याचे अनेक प्रकार उघडकीस आणणार असल्याचा दावा प्रफुल लोढा यांनी केला होता. यामुळे ते राज्यभरात अधिक चर्चेत आले होते. याबाबतचा सविस्तर व्हिडिओ रिपोर्ट राजमुद्राच्या माध्यमातून आम्ही तयार केला आहे.
प्रफुल्ल लोढा कोण आहेत ?
गेल्या काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्याच्या राजकारणासह राज्यात खळबळ माजवणारे आरोप झाले यामध्ये प्रफुल्ल लोढा हे नाव अग्रस्थानी होत. यामध्ये “सीडी” प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजले या वादाचे केंद्रबिंदू ठरलेले उद्योजक प्रफुल्ल लोढा अधिक चर्चेत आले होते.
राज्याचे ग्रामविकास मंत्री असलेले गिरीश महाजन यांच्यावर अनेक दावे- प्रतिदावे करून उद्योजक प्रफुल्ल लोढा यांनी आरोप केले माझ्या जीवितास गिरीश महाजन यांच्यासह त्याच्या समर्थकांकडून धोका आहे.
याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार देखील दिली होती. राज्यातील राजकीय मैदान हादरवून सोडणारे हे आरोप होते. लोढा यांनी त्याच काळात मंत्री गिरीश महाजन व भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर जाहीर पत्रकार परिषदेत एकेरी टीका केली त्या नंतर राष्ट्रवादीतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.
तेव्हा पासून ते आजगायत राजकीय दृष्ट्या त्यांची सक्रियता कमी झाली होती. मात्र ठाकरे गटाच्या कार्यक्रमात अचानक पणे लोढा हे दाखल झाल्या नंतर कार्यक्रमा ठिकाणी चांगलेच चर्चाना उधाण आले होते.