जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मंदाकिनी खडसे यांचा पराभव झाला पाहिजे यासाठी सात आमदार दोन खासदार दोन मंत्री व संपूर्ण भाजप भिरत असून हीच नाथाभाऊ ची ताकद आहे. या सर्वांना नाथाभाऊ भिंगरी सारखा फिरवत असल्याची टीका करत एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला होता.
तर निवडणुकीत जय पराजय ही नंतरची गोष्ट आहे मात्र सिंह एकटा लढतो पण गिधाड सारे एक होतात त्यामुळे गिधाडांना सिंहाची डरकाळीच काफी आहे. अशा शब्दातही एकनाथ खडसेंनी दूध संघाच्या निवडणुकीवरून गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांच्यासह भाजप व शिंदे गटाच्या आमदारांवर टीका केली आहे.
याबाबतचा व्हिडीओ रिपोर्ट…
https://youtu.be/dV7A89rEF
याबाबत अध्याप पर्यंत राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली आहे. मात्र आगामी काळात राजकीय महायुद्ध संपूर्ण राज्याला पाहायला मिळणार आहे.
एकीकडे खुर्चीला खुर्ची लावून बसणारे नेते राजकीय अस्तित्वासाठी एकमेका सोबत उभे टाकले गेले आहे. त्यामुळे राजकीय युद्धात कोण बाजी मारत ते आगामी काळात पाहायला मिळणार आहे.
राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सध्या मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एका मागे एक राजकीय आरोपाच्या फेऱ्या सुरू ठेवल्या आहे. खडसे हे त्यांच्या निवासस्थानातून अथवा सार्वजनिक कार्यक्रमातून आरोप अथवा व्यक्त होत होते.
मात्र खडसे यांनी थेट आता ग्रामविकास मंत्री असलेले गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. भाजपमध्ये असताना अन्यायाची भावना बोलून दाखवणारे खडसे आतापर्यंत कधीच जामनेर मध्ये जाऊन जाहीर रित्या बोललेले नाहीत.
मात्र राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जाऊन खडसे यांनी मंत्री गिरीश महाजनावर अनेक विखारी टिका केल्याचं पाहायला मिळाला आहे. यामध्ये अनेक खुलासे खडसे यांनी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.