मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यात सध्या स्वबळावर लढण्याचा वरून चांगलेच राजकारण पेटलेले आहे. राज्यात काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या भूमिकेत दिसून येत आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला कडक शब्दांमध्ये फटकारलं असून, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील काँग्रेसला खोचक सल्ला दिला आहे. ‘त्यांनी आधी पक्षातल्या गोंधळातून बाहेर यावं आणि नंतर स्वबळाचा निर्णय घ्यावा’, अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी आपले मत नोंदवले. काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टोमणा मारत राऊत म्हणाले “महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्या पक्षात देखील एक नेता म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार, दुसरा नेता म्हणतो ही आमची भूमिका नाही, त्यामुळे आधी त्या सगळ्यांनी गोंधळातून बाहेर यावं आणि नंतर स्वबळ वगैरे काय आहे यावर निर्णय घ्यावा. असे राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातल्या जनतेला आणि शिवसैनिकांना दिलेल्या दिशेनुसार “शिवसेना कोणत्याही लढाईसाठी कायम तयार आहे. बळावर अथवा स्वबळावर किंवा अन्य कोणत्याही विषयावर असो” असे वक्तव्य ही खासदार संजय राऊत यांनी यावेळी केले.