पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर राज्यभरातील शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. राज्यभरात ठीकठिकाणी भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध केला जात आहे. पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसने भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले. या आंदोलनात डमी भगतसिंग कोश्यारी यांना घेऊन येत कार्यकर्त्यांनी त्यांचे धोतर फेडलं.
पुण्यात शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वारगेट येथील सावरकर पुतळ्याजवळ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने डमी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आणत त्यांना उठाभाषा काढायला लावण्याबरोबरच त्यांचं धोतर फेडत अनोख्या पद्धतीने आंदोलन केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्हाला सांगायचे आहे की, हा महाराष्ट्र कालही छत्रपतींचा होता आजही छत्रपतींचा आहे आणि उद्याही छत्रपतींचा राहील. मात्र भाजपची लाचारी पत्करलेल्या मुख्यमंत्र्यांना सावरकरांचा अपमान दिसतो पण छत्रपतींच्या अपमानावर ते सोयीस्कर मौन बाळगून आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीका यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.