अमळनेर : शहरातल्या मुंदडा नगर भागातील एका १५ वर्षाच्या मुलाचा झोका घेत असताना गळ्याला गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील वेदांत संदीप पाटील ( वय १५ ) हा विद्यार्थी आपल्या घरी झोका खेळत अभ्यास करत होता. यावेळी झोका गरगर फिरून त्याची मान त्यात अडकली. यात त्याचा करूण अंत झाला. या दुर्दैवी घटनेत मयत झालेला वेदांत संदीप पाटील हा इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वेदांत हा सुशिक्षित कुटुंबातील असून त्याचे आई वडील हे दोघेही शिक्षक आहे. तो शिक्षिका जयश्री पाटील यांचा तो मुलगा आहे. वेदांतच्या या ओढवलेल्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण अमळनेर तालुक्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.