5जामनेर (प्रतिनिधी): मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसे यांच्या परिवारातील सदस्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा जामनेर तालुका राष्ट्रवादीकडून निषेध व्यक्त करण्यात आला. मंत्री महाजन यांचेवर मानहानी गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात केली.
जामनेरमध्ये राष्ट्रवादीकडून आयोजित भटके विमुक्तांसाठी आयोजित एका कार्यक्रमा एकनाथराव खडसे यांच्या बोलण्याचा विपर्यास करून बंजारा समाजातील जनतेला भ्रमीत करण्याचा प्रयत्न काही राजकीय असामाजिक तत्त्वांनी अवलंबला, त्याचाही निषेध राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या वतीने जामनेर तहसिलदारांना निवेदन देवुन नोंदविण्यात आला. यावेळी राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी बोलतांना सांगितले की, एकनाथराव खडसे याचे बंजारा समाजातील तरूणांना उद्देशून बोलणे म्हणजे अपमान करणे नव्हते तर प्रबोधनात्मक उद्देशाने त्यांनी बंजारा समाजातील तरूणांना आवाहन केले. मात्र काही असामाजिक राजकीय तत्वांनी त्या बोलण्याचा विपर्यास केला.
तर गिरीश महाजन यांच्यावरही गुन्हा दाखल करा
सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजनांनी देखील असेच वक्तव्य केलेले आहे, मग हा बंजारा समाजातील घटकांचा अपमान नव्हे काय? असा प्रश्न जाधव यांनी आपला निषेध व्यक्त करतांना केला. बंजारा समाजाबद्दल बोलण्याबाबतीत एकनाथराव खडसे यांच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर मंत्री गिरीश महाजन यांचेवर सुद्धा गुन्हा का दाखल करण्यात येवु नये? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.