जळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी हौशी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरी अंतर्गत २४ रोजी नाट्यप्रयोगाचे सादरीकरण रद्द करण्यात आले आहे. ते एक दिवस उशिराने होणार असल्याची माहिती समन्वयक भूषण वले यांनी दिली.
मराठी हौशी नाट्य स्पर्धेंतर्गंत सुबोध बहुउद्देशीय युवा प्रतिष्ठान जळगावतर्फे “अजूनही चांद रात आहे” या नाटकाचा प्रयोग २४ रोजी होणार होता. मात्र, सदर नाटकातील मुख्य कलावंत यांची अचानक प्रकृती अस्थिर झाल्याने, त्यांना दि.२२ रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे. त्यांना किमान ७ ते १० दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवावे लागणार आहे. त्यामुळे २४ रोजी होणारे उद्घाटन हे आता दि. २५ रोजी संध्याकाळी ६:३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. संजीवनी फाऊंडेशन, जळगाव या संस्थेच्या ‘जुगाड’ ह्या नाटकाने स्पर्धेस सुरुवात होईल. कलावंत आणि रसिक प्रेक्षकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन समन्वयक भूषण वले
यांनी केले आहे.