नवी दिल्ली: श्रद्धा वालकर हत्याकांडात अजूनही म्हणावे तसे पुरावे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. मात्र, हत्येच्या दिवशी श्रद्धाने तिच्या मित्रांसोबत काही चॅट केली होती. ही चॅट आता समोर आली आहे. 18 मे रोजी म्हणजेच मृत्यूच्या काही तास आधी श्रद्धाने हा संवाद साधला होता. श्रद्धाने दुपारी 4 वाजून 34 मिनिटांनी आपल्या एका मित्राला मेसेज पाठवला होता. पण हा आपला शेवटचा मेसेज असेल याची श्रद्धाला कल्पनाही नव्हती.
श्रध्दाने आपल्या मित्राला I have Got News… म्हणजे माझ्याकडे एक बातमी आहे, असा मेसेज तिने तिच्या मित्राला केला होता. त्यानंतर तिने अजून एक मेसेज केला होता. त्यात तिने ती व्यस्त असल्याचं म्हटलं आहे. त्याच दिवशी सायंकाळी 6.29 वाजता तिच्या मित्राने विचारलं काय बातमी आहे. त्यावर श्रद्धाने कोणतंच उत्तर दिलं नाही. त्यानंतर तिच्या मित्राने तिला अनेक मेसेज करून विचारणा केली. पण तिचं काहीच उत्तर आलं नाही.
मित्रांनी आफताबलाही केला होता मेसेज
15 सप्टेंबर 4 वाजून 35 मिनिटांनी मित्राने आफताबला मेसेज पाठवून काय झालं? तू कुठे आहेस? तुझ्याशी बोलायचं आहे असं सांगितलं होतं. यावेळी त्याने श्रद्धा कुठे आहे? अशीही विचारणा केली होती. पण आफताबने त्याला उत्तर दिलं नव्हतं. यानंतर मित्राने 5 वाजता आफताबला फोनही केली होता. पण आफताबने त्याचंही उत्तर दिलं नाही. 24 सप्टेंबरला मित्राने श्रद्धाला मेसेज करुन तू सुरक्षित आहेस का? अशी विचारणा केली. यानंतर मित्राला श्रद्धाला काहीतरी झालं असावं अशी शंका आली. मित्राने सांगितल्यानुसार, श्रद्धाच्या चॅटमध्ये 24 सप्टेंबरला करण्यात आलेले मेसेज वाचलेला दिसत आहे, पण कोणीही उत्तर दिलं नव्हतं.
हत्येनंतर आफताबाने मित्राला केला मेसेज
श्रध्दाच्या हत्येच्या 4 महिन्यांनी आफताबने इन्स्टाग्रामवरून श्रद्धाच्या मित्राला मेसेज केला आणि म्हटले की, ‘श्रद्धाला सांग मला कॉल करायला’. मानले जात आहे की आफताबला हे दाखवायचे होते की श्रद्धा त्याला सोडून गेली आहे आणि तो तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर आफताबने श्रद्धाच्या मित्रासोबत सुमारे 17 मिनिटांसाठी चर्चा केली. तो त्याला म्हणत राहिला की श्रद्धाला मला फोन करायला सांग. हा श्रध्दा आणि आफताबचा हा कॉमन फ्रेंड आफताबच्या प्रोफेशनल अकाऊंटला फॉलो करत होता.