मुंबई: टॅक्सशी संबंधित काम असो अथवा बँकेशी संबंधित, पॅन कार्ड एक महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. पॅन कार्ड नंबरमध्ये व्यक्तीच्या टॅक्स आणि गुंतवणुकीसंबंधित डेटा असतो. मात्र, पॅन कार्ड हरवल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अशा स्थितीमध्ये तुम्ही e-PAN Card डाउनलोड करू शकता.
जर तुमचे पॅन कार्ड कुठेतरी हरवले किंवा चोरीला गेले तर तुमची अनेक प्रकारची कामं थांबू शकतात. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून ई-पॅन कार्ड म्हणजेच पॅन कार्डची डिजिटल प्रत डाऊनलोड करू शकता. आयकर विभागाने नवीन वेबसाईट सुरू केली आहे. याद्वारे तुम्ही घरी बसून काही मिनिटांत तुमचे ई-पॅन कार्ड (ई-पॅन) डाऊनलोड करू शकता.
ई पॅन कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम, ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्ही आयकरच्या अधिकृत वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर क्लिक करा.
- यानंतर Instant E-Pan पॅनचा पर्याय निवडा.
- यानंतर तुम्ही नवीन ई पॅन पर्याय निवडा, येथे तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक विचारला जाईल, तेव्हा तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाका.
- जर तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक आठवत नसेल तर तुम्ही तुमचा आधार क्रमांक देखील टाकू शकता.
- यानंतर तुम्हाला अनेक नियम आणि अटी दिल्या जातील, ते वाचा आणि नंतर Accept पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल, हा OTP टाका.
- त्यानंतर सर्व तपशील तपासा आणि नंतर सबमिट बटण दाबा.
- पॅनची ही PDF तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर तुम्हाला पाठवली जाईल, तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता.