जळगाव : महानगरपालिकेचे नगरसेवक चेतन गणेश सनकत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महापालिका आकृतीबंधमध्ये सफाई कामगारांची 523 पदे समाविष्ट करणे या विषयाचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. त्या प्रस्ताववर मुख्यमंत्री शिंदे यांनी आकृतीबंध मधे समाविष्ट करण्याचे निर्देश प्रधान सचिव यांना यावेळी दिले.
जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन व जळगांव शहराचे आमदार राजूमामा भोळे व अंबरनाथ शहराचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहराचे नगरसेवक चेतन गणेश सनकत वर्षा बंगल्यावर उपस्थित होते.
स्वच्छतेचा विषय मार्गी लागणार
गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेचा मनुष्यबळाचा विषय एरणीवर आला होता. यामुळे महापालिकेत कामांचा बोजवारा उडाला होता. नगरसेवक चेतन सनकत याप्रकरणी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील होते त्यांच्याच प्रयत्नांना अखेर आकृतीबंध मध्ये 523 पदे समाविष्ट करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहे. मनुष्यबळाचा प्रश्न सुटल्यानंतर महापालिकेत मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचा विषय मार्गी लागणार आहे.