जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेच्या १६ व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे,
भव्य शामियाना उभारून तयार केलेल्या मंडपात गाळेधारकांचे कुटुंबीय साखळी उपोषणास बसले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या व्यथा माध्यमांच्या जवळ मांडल्या उपोषण स्थळी दररोज मार्केटमधील व्यापार्यांकडून वेगवेगळे आंदोलन करणायत येत आहे. त्यात प्रामुख्याने थाळीनाद, घंटानाद या आंदोलनाचा समावेश आहे. प्रशासनाने न्याय मिळवून द्यावा आणि गाळेधारकासंदर्भात घेण्यात येत असलेले अन्यायकारक धोरण मागे घेण्यात यावे अशी मागणी गालेधार्कातील कुटुंबातील महिलांनी केली आहे.