मुंबई : पोलिसांच्या थर्ड डिग्री पुढे भलेभले गुंडाना वाचा फुटते, खरे बोलू लागतात. मात्र, पोलिसांची थर्ड डिग्री काही कसाब, आफताब सारख्या गुन्हेगारांवर फरक पडत नाही. तर, त्यासाठी त्यांच्याकडून सत्य जाणून घेण्यासाठी नार्को टेस्ट केली जाते. आरोपींकडून गुन्हा कसा केला याचे मिळते जुळते धागेदोरे जुळवण्यास नार्को टेस्टमुळे मदत होते. नार्को टेस्टप्रमाणेच पॉलीग्राफ टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट देखील असते ज्याद्वारे पोलीस सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात.
नार्को टेस्ट एक ग्रीक शब्द आहे. याचा अर्थ एनेस्थेशिया किंवा टॉरपोर असाही होतो. या शब्दांचा वापर वैद्यकीय क्षेत्रात प्रामुख्याने केला जातो. बार्बिट्युरेट्स याचा विशेष वापर करुन साईकोट्रोपिक औषधं देत नार्को केली जाते. ही औषध माणसाला ग्लानी आणतात. या ग्लानीमध्ये माणूस पूर्णपणे बेशुद्ध नसतो आणि पूर्णपणे शुद्धीतही नसतो. ही त्याच्या मधली अवस्था असते. या अवस्थेत माणूस काहीही विचार करण्याच्या किंवा कोणतीही गोष्ट समजून घेण्याच्या मनस्थिती नसतो. त्यामुळे अशा अवस्थेत व्यक्तीला काहीही विचारलं तर तो खरंच बोलेल, असं मानलं जातं. माणूस शुद्धीत ज्या गोष्टींची उत्तर देणं टाळतो, अशा प्रश्नांची उत्तरं नार्को टेस्टच्या माध्यमातून मिळवता येऊ शकतात. पोलीस तपासात अनेकदा नार्को टेस्ट ही महत्त्वाची भूमिका बजावतात.
मनात दडलेल्या गोष्टी येतात बाहेर
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इन्वेस्टीगेशन यंत्रणांनी कैद्यांकडून माहिती काढून घेण्यासाठी ट्रूथ सिरम देऊन सत्य काढून घेण्याचं काम केलं होतं. हीच नार्को टेस्ट मानसिक आजार असलेले रुग्णांवर आम्ही पूर्वी अशा प्रकारे उपचार करून त्यांच्या मनात दडलेल्या गोष्टी जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. या रुग्णांच्या मनातील खूप अवघड असते. आता आम्ही या टेस्टचा वापर या रुग्णांसाठी करत नाही. काही टेस्ट करत असताना अनेस्थेशियाचे डॉक्टर, तज्ञाची टीम असते. ते वारंवार पल्स रेट, हार्ट रेट त्यावर लक्ष ठेवून असतात.
पॉलीग्राफ चाचणी कशी केली जाते?
पॉलीग्राफ चाचणीला सत्यशोधक चाचणी असेही म्हणतात. खोटे पकडण्यासाठी एक खास तंत्र आहे. यामध्ये आरोपी किंवा संबंधित व्यक्तीची चौकशी केली जाते आणि तो उत्तर देतो तेव्हा एका खास मशीनच्या स्क्रीनवर अनेक आलेख तयार होतात. नाडी, हृदय गती आणि रक्तदाब यातील बदलानुसार आलेख वर-खाली सरकतो. कोणी खरे बोलत आहे की खोटे हे त्याच्या आलेखावरून समजते. ग्राफमध्ये असामान्य बदल दिसत असल्यास, याचा अर्थ ती व्यक्ती खोटे बोलत आहे. परीक्षेच्या सुरुवातीला नाव, वडिलांचे नाव, वय आणि कुटुंबाशी संबंधित माहिती असे सामान्य प्रश्न विचारले जातात. यानंतर प्रश्न बदलला आहे. यासोबतच गुन्ह्याशी संबंधित प्रश्नावर व्यक्तीची नाडी, श्वास किंवा बीपी वाढल्यास आलेखात बदल दिसून येतात. जर ग्राफमध्ये बदल झाला असेल तर याचा अर्थ तो खोटे बोलत आहे.
ब्रेन मॅपिंग… मन वाचणे किती सोपे आहे
ब्रेन मॅपिंगद्वारे मेंदूमध्ये निर्माण होणाऱ्या लहरींचा अभ्यास केला जातो. ब्रेन मॅपिंगमध्ये सेन्सर्स व्यक्तीच्या डोक्याशी जोडलेले असतात. त्याच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी चाचणी केलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर हेड कॅप्चर ठेवले जाते. गुन्ह्याशी संबंधित दृश्ये त्या व्यक्तीसमोर सिस्टीमवर दाखवली जातात आणि कथन केली जातात. ब्रेन मॅपिंगमध्ये आरोपीच्या समोर ठेवलेल्या यंत्रणेवर व्हिडिओ, फोटो आणि ऑडिओ दाखवले जातात. या चाचणीसाठी कोणतेही औषध दिले जात नाही. चाचणी प्रयोगशाळेत खुर्चीवर बसून या खास तंत्राद्वारे सत्य-असत्य शोधले जाते. मशिनवर येणाऱ्या लाटा पाहून तो खरे बोलतोय की खोटे बोलतोय हे तपासले जाते. जेव्हा जेव्हा एखाद्या आरोपीला लॅबमध्ये नेले जाते तेव्हा त्यापूर्वी विशेष तयारी करावी लागते.