मुंबई : मुंबई महानगर पालिकेअंतर्गत रुग्णालयांमध्ये पदे भरली जाणार आहे. तरुणांना मुंबईतील लोकमान्य टिळक महानगरपालिकेच्या सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
सायन रुग्णालयात प्राशिक्षित अधिपरिचारिका पदांच्या एकूण 118 जागा भरण्यात येणार आहे. ही भरती सहा महिन्यांकरीता कंत्राटी तत्वावर केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण आणि जीएनएस पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवाराची नर्सिंग काऊन्सिलकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. किंवा त्याला तीन महिन्यात ही नोंदणी मिळवावी लागेल.
वयोमर्यादा:
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असावे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना यातून 5 वर्षांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रं :
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
पगार किती मिळणार?
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 30 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
अर्ज करण्याची मुदत:
2 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज परिचारिका आस्थापना कक्ष, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, सायन या पत्त्यावर पाठवायचे आहेत.