मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | आघाडी सरकार मधील मित्रपक्ष स्वबळाची भाषा करत असतांना गेल्या काही दिवसांपासून पुन्हा युती सरकार येईल अश्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यात नेत्यांच्या भेटीगाठी आणि पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत झालेले फोनवरील संभाषण गुलदस्त्यात असतांना आज भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विट ने पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
“महाराष्ट्रात “भगव्या”चं राज्य येते आहे” असे ट्विट करत नितेश राणे यांनी राजकारणात खळबळ माजवली आहे. दरम्यान राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांचे आघाडीचे सरकार असतांना त्यात आता लवकरच महाराष्ट्रात भाजप सेना युतीचे सरकार येणार का ? या तर्क वितर्काने मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.