जळगाव : झटपट लोन मिळेल’ असे मेसेज पाठवून न मागता लोन देऊन नंतर वेगवेगळ्या ३५ लोन अॅपच्या माध्यमातून लाखो रुपयांत देशभरात ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीला मास्टरमाइंडसह जळगाव सायबर पोलिसांच्या पथकाने पकडले आहे.
या भामट्यांना ताब्यात घेण्यासाठी सायबर पोलिसांची दोन पथके कर्नाटक व तामिळनाडू या दोन राज्यांत सलग सहा दिवस दिवसरात्र त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती. दोन जणांना ताब्यात घेऊन पथक शनिवारी जळगावात परतले आहे. जळगाव जिल्ह्यातील पहूर येथील एकाला मागणी केलेली नसताना मोबाइलवर मेसेज व कॉल करून लोन अॅप डाऊनलोड करण्यास सांगून ते वसूल करून वरून सव्वाचार लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार या दोघांना अटक करण्यात आली आहे.