जळगाव राजमुद्रा | जळगाव महापालिकेचे आयुक्त विद्या गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच उपायुक्त पदावरून आयुक्त म्हणून तत्कालीन आयुक्त कुलकर्णी यांच्या जागेवर आयुक्त म्हणून बढती देण्यात आली होती. मात्र अचानक पणे विद्या गायकवाड यांची बदली करण्यात आल्याने प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली आहे.
विद्या गायकवाड यांच्या जागेवर परभणी येथील देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांना तडकाफडकी पदभार स्वीकारण्याचे आदेश देखील मंत्रालय स्तरावरून देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.बुधवारी नवनियुक्त आयुक्त देविदास पवार पदभार स्वीकारतील असे प्रशासकीय पातळीवरून समजते आहे.
प्रथमच आयुक्त विद्या गायकवाड यांना जळगाव महापालिकेत बढती देण्यात आली होती. यामुळे जळगाव महापालिकेचा कारभार म्हणजे त्यांच्या साठी सुवर्ण काळ होता. मात्र काही राजकीय वादामुळे त्यांची अचानकपणे बदली करण्यात आली आहे.
महापालिकेत शिंदे गट,ठाकरे गट,भाजप बंडखोर, निष्ठावंत भाजप असे अनेक राजकीय वाद निर्माण झाले आहे. जळगाव शहरात मंदावले विकासकामे, रस्त्यांची झालेली चाळणी नागरिकांना पायाभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यातच मनपाच्या राजकीय पटलावर उफळलेली गटबाजीचा फटका आयुक्तांच्या बदलीचे मुख्य कारण असल्याचे समजते आहे.
आमदार सुरेश भोळे यांच्यासह काही प्रमुख नेत्यांनी आयुक्तांच्या कारभारा विषयी तक्रारी केल्या होत्या, जिल्ह्यातील मंत्री महोदयांचा अतीशय लाडक्या अधिकाऱ्यांवर मनपातील सत्ताधाऱ्यांच्या दबावाखातर झालेली बदली (कार्यवाही) अशी देखील कारणे चर्चिले जात आहे.