मुंबई: जागतिक बाजाराच्या उलट भारतीय शेअर मार्केट सलग सातव्या दिवशी तेजीने उघडला. आज निफ्टी सुरुवातीच्या व्यवहारात 18,600 वर आणि बँक निफ्टी 69 अंकांनी वाढून 43,122 वर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 150 हून अधिक अंकांची उसळी घेताना दिसला. राष्ट्रीय निर्देशांक निफ्टी 50 ने हॅटट्रिक केली आणि इंडेक्सने 18,679.55चा आणखी एक आजीवन उच्चांक गाठला.
अमेरिकन आणि आशियाई बाजारातील घसरणीच्या उलट, बुधवारी भारतीय शेअर बाजारात तेजी कायम राहिली आहे. बीएसई सेन्सेक्स सकाळी 9:16 वाजता 122.89 अंक म्हणजेच 0.20 टक्क्यांच्या वाढीसह 62,804.73 अंकांवर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय निर्देशकांचा एनएसई निफ्टीने 40.80 अंकांच्या किंवा 0.22 टक्क्यांनी वाढून 18,658.85 अंकांच्या पातळीवर व्यवहार सुरु केला. बजाज ऑटो निफ्टीवर सर्वाधिक 1.14 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे हिंदाल्को, महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी एंटरप्रायझेस आणि टाटा मोटर्स यांचे समभाग एक टक्क्यानी वाढले.
कोणते शेअर्स घसरले
निफ्टीच्या सुरुवातीच्या व्यवहारात, इन्फोसिसच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी 0.64 टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय बीपीसीएल, एचसीएल टेक, पॉवरग्रीड आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्सही लाल चिन्हासह बंद झाले.
आशियाई शेअर बाजारात घसरण
चीनमधील कोविड-19 शी संबंधित धोरणांमुळे आणि बुधवारी फेड रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाषणाबाबत सावध पवित्रा घेतल्याने मंगळवारी अमेरिकन बाजारातील ब्रेकनंतर आशियाई शेअर बाजारांमध्येही घसरणीचा कल दिसून आला. याशिवाय जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियातील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली तर दुसरीकडे हाँगकाँगच्या वायदे बाजारातही घसरण दिसली.
SGX निफ्टीची नकारात्मक सुरुवात
सिंगापूर एक्स्चेंजवर निफ्टी फ्युचर्स 15 अंकांनी घसरला. परिणामी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक होण्यास संकेत मिळाले.
तेलाच्या किमती वाढल्या
अमेरिकेतील क्रूड इन्व्हेंटरीमध्ये घट झाल्यामुळे बुधवारी सुरुवातीच्या व्यापारात तेलाच्या किमतीत उसळी पाहायला मिळाली. पण OPEC+ त्याच्या आगामी बैठकीत उत्पादन धोरणात कोणतेही बदल करणार नाही, ज्यामुळे तेलाच्या किमतींमध्ये वाढ मर्यादित होते, अशी चिंता कायम राहिली.