मुंबई : कर्मचारी राज्य विमा महामंडळानं अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार ESIC मध्ये 45 पदांची भरती होणार आहे. ज्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे केली जाईल. या भरती मोहिमेशी संबंधित तपशील तपासण्यासाठी उमेदवार अधिकृत साईट www.esic.nic.in ला भेट देऊ शकतात.
ही भरती मोहीम ESIC मध्ये वरिष्ठ निवासी 45 रिक्त पदांच्या भरतीसाठी आयोजित केली जाईल. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर / MD / MS / DNB / MBBS पदवी आणि इतर विहित पात्रता आणि कामाचा अनुभव असावा.
वयोमर्यादा
या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं कमाल वय पदानुसार 45/69 वर्ष निश्चित करण्यात आलं आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
कशी होणार निवड?
या पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी वॉक-इन-इंटरव्ह्यूचं आयोजन केलं जाणार आहे. पडताळणीच्या वेळी उमेदवारांना त्यांच्या मूळ कागदपत्रांच्या सेल्फ अटेस्टेड प्रती सादर कराव्या लागतील. वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांकडून कोणताही TA/DA देय असणार नाही.
मुलाखत कधी असणार?
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित राहावं लागेल. वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी 9 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत वॉक-इन-इंटरव्ह्यूचं आयोजन केलं जाईल.
अर्ज शुल्क
या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावं लागेल. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज फी म्हणून 300 रुपये अर्ज भरावे लागतील. ही मुलाखत ESIC मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, ओखला येथे होणार आहे.