मुंबई: राज्यातील 4 हजार 122 तलाठी आणि तलाठी संवर्गातील पदे भरली जाणार असून त्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील 06 विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय माहिती 15 दिवसात शासनास पाठविण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहे.
राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी पत्र काढून तलाठी संवर्गातील 31 डिसेंबर 2022 रोजी रिक्त होणारी 1012 पदे आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली 3110 पदे, असे एकूण 4122 पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच राज्यातील विभागनिहाय रिक्त पदांची माहिती घेऊन त्यातील एमपीएसी मार्फत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी जानेवारीत जाहीरात काढून ती पदे भरण्यासाठी प्रक्रिया आयोगाद्वारे केली जाणार असल्याने आयोगाकडे वेळेत माहिती पाठविण्याबाबत स्पष्ट आदेशही दिले आहेत.
विभागनिहाय पदसंख्या
नाशिक – 1035
औरंगाबाद – 874
कोकण – 731
नागपूर – 580
अमरावती – 183
पुणे – 746
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा :
सर्वसाथारण प्रवर्ग: 19 ते 38
मागास प्रवर्ग: 19 ते 43
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र कुठेही
किती पगार मिळेल?
5200 ते रु. 20200 + ग्रेड पे रु. 2,400.