मुंबई : मुंबईतील मालाडमध्ये एका 21 मजली इमारतीमध्ये भीषण आग लागल्याने खळबळ उडाली आहे. जनकल्याण नगरमध्ये असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवडी परिसरातल्या जनकल्याण नगर येथील मरिना एन्क्लेव्ह इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही आग लागली. सकाळी सव्वाअकरापर्यंत ही आग विझवण्यात आली. या घटनेत आठ जण जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.
शिडी लावून लोकांना बाहेर काढले
तिसऱ्या मजल्यावर आग लागली. साधारणतः सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर एकच पळापळ सुरू झाली. अनेकजण तिसऱ्या मजल्यावर अडकले होते. ही माहिती अग्निशमन दलाच्या पथकाला समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शिडी लावून अनेकांना उतरवले. आगीच्या भीतीने एक तरुण खिडकीतून उतरून इमारतीच्या बाहेर आला. त्यालाही अग्निशमन दलाच्या पथकाने सुखरूपपणे खाली उतरवले.
तरुणीने मारली उडी
यावेळी जीव वाचवण्यासाठी एका तरुणीने तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी घेतल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आगीच्या ज्वाळा खिडकीतून बाहेर येताना दिसत आहेत. यामुळे परिसरात धुराचं साम्राज्य पाहायला मिळत आहे.