जळगाव राजमुद्रा | शहरातील गोल्ड सिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडून ऑपरेशन सुरू असताना अचानक पणे महिलेच्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे, आपल्या आईचा मृत्यू झाल्याने मुलाने तसेच नातवाईकांकडून आक्रोश करण्यात येत आहे. या दरम्यान नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासन व डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे आमच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्या असल्याचा आरोप केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील विखरन येथील मायाबाई अशोक देवरे (वय 38) रा विखरण मु पो – नाशिक येथून गोल्ड सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या, रोटरी ईलाईट च्या माध्यमातून प्लास्टिक सर्जरी यासह अन्य उपचारावर मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये राज्यभरातून रुग्णांनी प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदवला होता यामध्ये पुढील उपचार हे चेन्नई येथील प्रसिद्ध तज्ञ डॉ शंकर श्रीनिवास सुब्रमण्य यांच्या माध्यमातून करण्यात येणार होते.
रोटरी, हॉस्पिटल प्रशासनाने दिलेली माहिती
३ डिसेंबर रोजी दुपारी १:०० वाजेच्या दरम्यान रुग्णालयात तपासणी साठी आले मायाबाई अशोक देवरे वय 38 पेशंट नाशिक हुन आले होते,जळीत रुग्ण असल्याची माहिती दिली यामध्ये मान जळालेली होती, गिरीड येथील मेहुणा सोबत होता, ४:३० वाजे दरम्यान शस्रक्रिया करण्यासाठी भूल तज्ञ पूनम लढे आले होते त्यांनी भूल दिली, बेशुद्ध केलं
शंकर श्रीनिवासन ( सुब्रमण्यम) ऑपरेशन सुरू केले मात्र ऑपरेशन सुरू असताना हृदय विकाराचा झटका आला स पम्पिंग देऊन जीव परत आला त्याच वेळी ऑपरेशन थांबवण्यात आले त्याच परिस्थितीत आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले, व्हॅटीलेटरवर टाकण्यात आले होते.
८:३० वाजे दरम्यान पुन्हा हृदय विकाराचा झटका आला मात्र पुन्हा जीव वाचविण्यात अपयश आले, आवश्यक चाचण्या केल्या नंतर त्यांना मृत्यू घोषित करण्यात आले.
मात्र रुग्णालयामध्ये नाते चालू करून मोठ्या प्रमाणात मायाबाई अशोक देवरे यांचा मृत्यू झाल्यास आक्रोश करण्यात येत आहे तसेच हॉस्पिटल प्रशासनावर कठोर कारवाई करावी तसेच दोषी असलेल्या डॉक्टरांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.