मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | भाजपने आता शवासन करावं, आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यामुळे राऊतांच्या टीकेला भाजप काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांना मिडीयाने प्रश्न विचरला असता, तुम्ही भाजपला कोणते आसन सुचवणार.? तर, त्यांनी भाजपवर आपल्याच शैलीत हल्ला चढवला. आज आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे. त्यामुळे भाजपने ‘शवासन’ करावं असं राऊत म्हणाले.
आम्ही वाघाच्या काळजाची माणसं आहोत. शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं यात आम्ही मोडत नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार आहोत. आम्ही महाभारताची उदाहरणे देतो. त्या महाभारतातील योद्धे आम्हीच आहोत, असं सांगतानाच माझं नाव संजय आहे, असा इशारा राऊत यांनी दिला.
आम्ही सत्तेत असल्याने काही लोकांची पोटदुखी वाढली आहे. त्यांनी काहाही कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी आघाडी सरकार पाच वर्षे चालणारच, असं सांगतानाच आघाडीतील तिन्ही पक्षाचा उत्तम समन्वय आहे. तसेच हे सरकार पाच वर्ष चालवायचं ही तीन पक्षाची कमिटमेंट आहेत. कॉमन मिनिमम प्रोग्राम हाच सरकार चालवण्याचा पाया आहे, असंही त्यांनी सांगितलं.