जळगाव राजमुद्रा | भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे आधीच वर्षभरात पासून सरकार चालवणारे उद्धव ठाकरे आज सरकार चालवण्याचा सांगताहेत गेल्या अडीच वर्षात फेसबुक वर चालणारे सरकार होतं आता शिंदे फडणवीस सरकार लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आणणार सरकार असल्याचे त्यांनी पलटवार केला आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद सध्या मोठ्या प्रमाणात पेठ घेताना दिसून येत आहे. राजकीय नेत्यांनी देखील अनेक प्रतिक्रिया याबाबत व्यक्त केले आहेत महाराष्ट्रातील नेते सीमा वादा प्रश्नावर आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. यामध्ये मोठे राजकारण देखील होत असल्याचे दिसून येत आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादाचा मुद्दा श्री घडला असताना महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटक मध्ये येण्यासाठी बंदी घालण्याचा फतवा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोंम्मई यांनी काढला आहे. यावरून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने कडाडून निषेध करण्यात आला आहे. यामध्ये महाविकास आघाडी कडून शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न तालुका काढता येत नसेल तर सीमावाद मिटवण्याची आणि सरकार चालण्याची जबाबदारी मी घेतो, असे राजकीय विधान केले होते. या विधानाचा समाचार भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ घेतला आहे.
सीमावाद प्रश्नावर कोणाला काळजी करण्याची गरज नाही या महाराष्ट्राची टाचणी भर जागा देखील आम्ही कोणाला देऊ देणार नाहीत असा दावा भाजप नेत्या चित्रा भाग यांनी केला आहे. हे सरकार अतिशय सक्षमपणे कार्य करतय त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार सीमावादाचा प्रश्न सोडवेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.