जळगाव राजमुद्रा । महसूल यंत्रणेकडून जप्त करण्यात आलेले वाळू ठिय्ये अवघ्या काही तासात शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराला वितरित केले गेल्याने खळबळ उडाली आहे, तेवढेच नाही तर वाळू ठिय्ये काही तासातच वाहनात भरून वाहतूक देखील केली गेल्याने महसूल विभागातील त्या अधिकाऱ्यांची भुमीका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. महसूल विभागाकडून जप्त असलेल्या वाळू ठिय्यांचा लिलाव करण्यासाठी आता पर्यत अशी अनेक पत्रे विविध कंपन्यांकडून देण्यात आली आहे, मात्र इतक्या तप्तरतेने अद्याप पर्यत वाळू ठिय्ये विक्री करण्यात आलेले नाही. प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून सध्या उपजिल्हाधीकारी असलेले प्रवीण महाजन यांच्याकडे पदभार आहे.
वाळू नेमकी कुठे वापरली जाणार याबाबत देखील मोठा संशय कल्लोळ आहे, खाजगी कामासाठी वाळू वाहतूक होत असल्याचा प्रकार अनेक वेळा समोर आला आहे. शासकीय कामाच्या नावावर महसूल विभागाला पत्रे देऊन वाळू ठिय्ये लिलाव करण्याची मागणी करण्यात येते, नेमके हे ठिय्ये नदी किनारी असल्याने संबंधित ठेकेदार थेट वाळू ठिय्याची वाहतूक न करता नदी पात्रातून वाहतूक करीत असतो यामध्ये यंत्रणेतील काही अधिकारी लाभार्थी असल्याने ते उघडपणे नदी पात्र ओरबारडत असतात.
ठिय्या अद्याप पर्यंत वाहतूक केला नाही म्हणून लाभार्थ्यांच्या माध्यमातून मुदत वाढ घेत असतात मात्र वरिष्ठांच्या डोळ्यात धूळ फेक करणारे महसूल विभागातील झारीतील शुक्राचार्यच असतात हा प्रकार चौकशी केल्यास समोर येईल. यामुळे गिरणेची लूटमार करायला फावले जाते हे उघड सत्य आहे.
खेडी,आव्हाने,फुफनगरी, आव्हानी,वननगरी, निमखेडी, सावखेडा याभागातून महसूल विभागाची पथके नियुक्ती केल्यावर देखील अद्याप पर्यत वाळू वाहतूक थांबायला तयार नाही, जिल्हाधिकारी अमन मित्तल सध्या कुटुंबिक कार्यक्रमा निम्मिताने राज्या बाहेर आहेत, जिल्हाधिकारी राज्याबाहेर असल्याचा अनेक जण गैरफायदा घेत असल्याचा पाहायला मिळत आहे,