जळगाव : विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे अधिनिस्त असलेल्या जळगांव कार्यालयात भरती निघाली आहे. विधी अधिकारी गट ‘ब’ व विधी अधिकारी या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 09
रिक्त पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
विधी अधिकारी गट ‘ब’
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल.
- वकिली व्यवसायाचा किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.
- उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनीक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असावा.
- उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.
विधी अधिकारी
वयोमर्यादा – 60 वर्षे
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा.
- वकिली व्यवसायाचा किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.
- उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनीक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशीचे ज्ञान असावे.
- उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.
इतका पगार मिळेल?
– विधी अधिकारी गट ब या पदाकरिता एकत्रीत अनुज्ञेय मासिक देय रक्कम 25 हजार + दुरध्वनी व प्रवास खर्चाकरिता 3 हजार असे एकुण 28 हजार दरमहा देय राहील.
– विधी अधिकारी पदाकरिता एकत्रित अनुज्ञेय मासिक देय रक्कम 20 हजार + दुरध्वनी व प्रवास खर्चाकरिता 3 हजार असे एकुण 23 हजार रुपये दरमहा देय राहील.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस अधीक्षक, अहमदनगर, एस. पी. चौक, नगर-औरंगाबाद रोड, अहमदनगर – 414001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 डिसेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : jalgaonpolice.gov.in