मुक्ताईनगर : गुजरात राज्यातील एका दुकानदाराला औषध देण्याचा बहाणा करून लुटमार करण्यात आली आहे. व्यापाऱ्याला घरी बोलावून चाकू, बंदूक आणि काठ्यांचा धाक दाखवत १० ते १२ जणांनी दीड लाखांची रोकड, मोबाईल, सोन्याची चैन असा एकुण २ लाख ५९ हजार ५९९ रूपये किंमतीच मुद्देमाल हिसकावून चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.
दर्शन बिपीनभाई सौलंकी (वय-३२) रा. जांगीपूरा डबोली सुरत (गुजरात) हा तरूणी दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतो. मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी गावातील सुरेश चव्हाण याने दर्शन सौलंकी याला औषध घेण्याचा बहाणा करून मधापुरी गावाला बोलविले. त्यानुसार दर्शन हा १ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता मधापुरी गावात मित्र विशाल उगाभाई गलचर याच्यासोबत आला.
बेदम मारहाण केली
दरम्यान, दर्शन हा सुरेशला भेटल्यानंतर त्याच्यासह इतर १० ते १५ जणांनी तोंडावर रूमाला बांधून त्यांच्याजवळ बंदूक, चाकू आणि काठ्या होत्या. त्यांनी सुरूवातीला दर्शनचा मित्र विशाल गलचर याला बेदम मारहाण केली व त्याच्या खिश्यातील दीड लाखांची रोकड काढून घेतली.
मुद्देमाल हिसकावून घेतला
त्यानंतर भारत प्रविण पवार यांच्या बँक खात्यात संलग्न असलेल्या शुभम पाटील याच्या मोबाईलवर गुगल पे वरून ४९ हजार ९९९ रूपये पाठविले. आणि विशालच्या गळ्यातील १५ ग्रॅमची सोन्याची चैन असा एकुण २ लाख ५९ हजार ५९९ रूपये किंमतीच मुद्देमाल जबरी हिसकावून घेतला.
पाच दिवसानंतर दिली तक्रार
दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर पाच दिवसानंतर दर्शन सौलंकी याने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुरेश चव्हाण याच्यासह इतर १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहूल बारेकर करीत आहे.