मुंबई : 12 वी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2022 साठीची जाहिरात नुकतीच निघाली आहे. यासाठी भरती प्रक्रिया 6 डिसेंबर 2022 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2023 आहे.
SSC CHSL 2022 परीक्षेद्वारे SSC लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), पोस्टल सहाय्यक, वर्गीकरण सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) या पदांसाठी ही भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 12 वी (मध्यवर्ती) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयाची अट :
वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल २७ वर्षे असावी. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
पगार :
कनिष्ठ विभाग लिपिक : पे लेवल-2 (19,900-63,200 रुपये).
डेटा एंट्री ऑपरेटर: पे लेवल-4 (25,500-81,100 रुपये) और लेवल-5 (29,200-92,300 रुपये).
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’’: पे लेवल -4 (25,500-81,100 रुपये).
ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख: 04 जानेवारी 2023
ऑनलाइन परीक्षा दिनांक : फेब्रुवारी / मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in