जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव मनपाच्या घरकुल घोटाळा प्रकरणात भाजपचे पाच नगरसेवक दोषी ठरले असून त्यांना अपात्र करण्यासाठी काही दिवसापूर्वी महासभेत ठराव करण्यात आला या प्रकरणातील जिल्हा न्यायालयात दाखल दाव्यात २३ जून रोजी सुनावणी होणार असल्याचे समजते त्यामुळे मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी हे काय भूमिका घेतात याकडे महापालिकेतील नगरसेवकांचे लक्ष लागून आहे.
पालिकेच्या घरकुल घोटाळ्यात पाच नगरसेवक दोषी ठरले आहेत सध्या सर्व नगरसेवक जामिनावर आहेत. आणि पालिकेच्या कामकाजात सक्रीय सहभाग घेतात या पाचही नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी शिवसेनेने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. नगरसेवक प्रशांत नाईक यांनी जिल्हा न्यायालयात अपत्रसाठी दावा दाखल केला आहे. दरम्यान कोरोना काळात सुनावणी लांबणीवर पडली आहे.