जळगाव: शहरालगत शिरसोली रोडवर असलेल्या रायसोनी कॉलेज जवळील त्यांच्या मालकीच्या टेकडीच्या जागातून वारेमाप गौणखणीत काढण्याचे काम सुरू असून प्रत्यक्षात परवानगी पेक्षा अधिक पटीने गौण खनिज उत्खनन करण्याचा धडाका सुरू आहे. परवानगी शेकडो ब्रासची तर उत्खनन हजारो ब्रासचे असे चित्र दिसत असून या माध्यमातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्याचे काम महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदारांचा गोरख धंदा सुरू असल्याचे चर्चा रंगली आहे. याकडे वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
शहरालगत शिरसोली रोडवर जीएच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. या परिसरात महाविद्यालयाच्या मालकीचे मोठमोठे मुरूम असलेली टेकडी आहे. या ठिकाणावरून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पोकलेन व जेसीबीच्या साह्याने गौण खनिजाचे उत्खनन सुरू आहे. या उत्खननासाठी परवानगी मात्र 27 घेण्यात आल्याचे समजते. तर दिवसा गणितच शेकडो ब्रास गौण खनिज वाहिले जात आहे.
दोनशे ब्रासची परवानगी
गौण खनिज उत्खननासाठी महसूल विभागाकडून परवानगीच्या नावाखाली दोनशे ब्रासची नाममात्र परवानगी काढण्यात येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणाहून दोन मोठ्या डंपरच्या सहाय्याने रात्रंदिवस गौण खनिज वाहतूक सुरू आहे. एका डंपरमध्ये सहा ब्रास म्हणून ओळखला जातो. दिवसभरात दोन डंपरच्या साह्याने 15 ते 20 फेऱ्या धरल्या तरी दिवसभरात दोनशे ब्रास पेक्षा जास्त गुणगणीच वाहतूक होत आहे.
शासनाचा लाखोचा महसूल बुडतोय
याबाबत सत्यता पडताळणी केल्यास महाविद्यालय परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज द्वारे याची माहिती मिळू शकेल. या परिसरातून मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन करत संबंधित गौण खनिज वाहतूक करणारा कंत्राटदार काही महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आर्थिक हित साधून शासनाचा लाख रुपयांचा महसूल बुडवत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्ष गौण खनिज उत्खनन केलेल्या जागेची मोजणी केल्यावर तिथेच झालेला प्रकार उघडकीस येईल. याबाबत महसूल विभागाचे अप्पर जिल्हाधिकारी तसेच कर्तव्यवधीक्षक जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी असा सूर नागरिकांमधून निघत आहे.