रावेर : रावेर पंचायत समितीत बहुचर्चित वैयक्तिक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणी रावेर पोलिसांनी पुन्हा अटकसत्र राबविले आहे. यात वेगवेगळ्या गावांमधून पोलीसांनी एकूण ९ आरोपींना अटक केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता पर्यंत ३३ आरोपी अटक करण्यात आले आहेत.
रावेर पंचायत समितीत बहुचर्चित शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणी पोलिसांनी अटकसत्र राबवित वेगवेगळ्या गावांमधून नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये गोकुळ करुले (अटवाडे), ललित सोनार (निंभोरा), बाळु कोळी (रणगाव), विश्वनाथ कोळी (रायपुर), प्रवीण इंगळे (रावेर), भूषण पाटील (धामोडी), गोकुळ रुले (मस्कावद सिम), युवराज बोदडे (निंभोरा), रविंद्र पाटील (मोरगाव) यांना अटक करण्यात आल्याची माहीती पोलिसां कडून मिळाली आहे. रावेर तालुक्यातील अजुन बडे मासे रडारवर असल्याचे वृत्त आहे.