जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकची मतमोजणी सुरू झाली आहे. काही जागांचा निकाल समोर आला असून, संपुर्ण निकालानंतर लवकरच येथे कुणाची सरशी होणार हे कळणार आहे.
दूध संघाच्या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विजय संपादन केला असून, त्यांची सहकारात एन्ट्री झाली आहे. भुसावळचे आमदार संजय सावकारे हे एससी संवर्गातून तर एनटी संवर्गातून अरविंद भगवान देशमुख यांनी विजय संपादन केला आहे. दोघं विजयी उमेदवार शेतकरी विकास पॅनलचे होते.
विजयी उमेदवार
अरविंद देशमुख यांनी आधी दुध संघावर प्रशासक म्हणून काम केले होते. त्यांनी आ. मंगेश चव्हाण यांच्या मदतीने संचालक मंडळाचा गैरव्यवहार समोर आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. यानंतर त्यांना उमेदवारी देखील मिळाल्याने त्यांच्या जागेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दूध संघ निवडणुकी मध्ये एनटी राखीव मतदार संघातून अरविंद देशमुख 90 मतांनी विजयी झाले. ओबीसी मतदारसंघात पराग वसंतराव मोरे यांनी ३१ मतांनी पुढे विजय मिळवला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छायाताई गुलाबराव देवकर या विजयी झाल्या आहेत.