जळगाव : जिल्हा दुध संघाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भुसावळ तालुक्याचे आमदार आमदार संजय सावकारे हे शेतकरी विकास पॅनलकडून विजयी झाले आहेत. योगायोगाने रविवार, 11 डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस असतानाच त्यांना दुहेरी गिप्ट मिळाली आहे. दरम्यान, या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने विजयाकडे आगेकुच केल्याची माहिती आहे.
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी शेतकरी विकास पॅनलकडून अनुसूचित जाती या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरूध्द ब्रह्मे यांनी उमेदवारी केली होती. या लढतीत सावकारे यांचे पारडे जड मानले जात होता. निकालातून तसे अधोरेखीत झाले. सावकारेंनी अगदी सहजगत्या विजय संपादन केला. ते आधीच जिल्हा बँकेत संचालक असून आता जिल्हा दुध संघात देखील त्यांची एंट्री झाली आहे. रविवारी सकाळी झालेल्या मतमोजणीत आमदार संजय सावकारे यांना 264 इतकी मते मिळाली आहेत.