जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणूकीत खडसेंना धक्का बसला असून यात मंत्री गिरीश महाजन यांच्या गटाने १५ तर खडसे गटाला ५ जागांवर विजय मिळविता आला आहे.
जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणुक प्रक्रीया पार पडली. या निवडणूकीत खडसे विरूद्ध गिरीश महाजन अशीच लढाई पहावयास मिळाली. प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाल्या. खडसे हे भाजपमध्ये असताना त्यांचा विजय होवून पत्नी मंदाकिनी खडसे यांची चेअरमन पदी निवड झाली होती. मात्र खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश व राज्यातील सत्तांतरानंतर दूध संघावर विजय कोणाचा याकडे लक्ष होते. मात्र आजच्या निकालानंतर चित्र स्पष्ट झाले आहे.
मंदाकिनी खडसेंचा पराभव
दूध संघाच्या चेअरमन असलेल्या मंदाकिनी खडसे यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. मुक्ताईनगर मतदार संघातून त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी विजय प्राप्त केला आहे. अर्थात हा एकनाथ खडसेंचा धक्का मानला जात आहे. तर भाजप आमदार संजय सावकारे हे एससी मतदार संघातून विजयी झाले आहे.
विजयी उमेदवार
एनटी – विजयी अरविंद देशमुख २५९, पराभूत विजय पाटील १७९
एससी – विजयी संजय सावकारे २७६, पराभूत श्रावण ब्रम्हे १६१
ओबीसी – विजयी पराग मोरे २३०, पराभूत गोपाळ भंगाळे २०७
महिला राखीव- सहकार पॅनल छाया देवकर २३५, शेतकरी पॅनल पूनम पाटील २५७