जळगाव : संपुर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीचा निकाल जाहीर झाले आहेत. या निकालामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटानं विजय मिळवला असून, खडसेंच्या ताब्यातील एकमेव संस्था देखील ताब्यातून निसटली आहे. एकूण २० पैकी १६ जागांवर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर खडसे यांच्या गटाला केवळ चार जागा मिळाल्या आहेत.
जिल्हा दुध संघात आगामी पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजली आहे. यात एकूण २० संचालकांची निवड करण्यात येणार असून यात पाचोरा तालुक्यातून माजी आमदार दिलीप वाघ हे आधीच बिनविरोध निवडून गेले आहेत. यामुळे १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीसाठी एकूण ४४१ मतदार असून जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर शनिवारी सर्वच्या सर्व मतदारांनी आपला हक्क बजावला होता.
कोणाला किती मते मिळाली?
– मुक्ताईनगर मतदार संघ: आ. मंगेश चव्हाण (विजयी-एकूण मते २५५), मंदाकिनी खडसे (एकूण मते १७९)
– जामनेर मतदार संघ: मंत्री गिरीश महाजन (विजयी- एकूण मते २७६), दिनेश पाटील (एकूण मते १५८)
– पारोळा मतदार संघ : आ.चिमणराव पाटील (विजयी- एकूण मते २२७), सतीश अप्पा (एकूण मते २०८)
– रावेर मतदार संघ : जगदीश बढे (एकूण मते १७०) ठकसेन पाटील (विजयी २६६)
– जळगाव मतदार संघ : मालती महाजन (एकूण मते १६२), गुलाबराव पाटील (विजयी- एकूण मते २७२)
– एरंडोल मतदार संघ : दगडू चौधरी (विजयी- एकूण मते २३०), अमर जैन ( २०५)
– भडगाव मतदार संघ : रावसाहेब भोसले (विजयी – एकूण मते २३३), डॉ. संजीव पाटील (एकूण मते २००)
– भुसावळ मतदार संघ : शामल झांबरे (विजयी- एकूण मते २६३), शालिनी ढाके (एकूण मते १६९)
– बोदवड मतदार संघ : ऍड. रवींद्रभैया पाटील (एकूण मते २१६), मधुकर राणे (विजयी-एकूण मते २२०)
– चाळीसगाव मतदार संघ : प्रमोद पाटील (विजयी- एकूण मते २४७), सुभाष पाटील (एकूण मते १८८)
– चोपडा मतदार संघ : इंदिराबाई पाटील (एकूण मते १६४), रोहित निकम (विजयी एकूण मते २६९)
– धरणगाव मतदार संघ : वाल्मिक पाटील (एकूण मते १६७), संजय पवार (विजयी- एकूण मते २६९)
– अमळनेर मतदार संघ : आ. अनिल पाटील (विजयी- एकूण मते २४६), स्मिता वाघ (एकूण मते १८४)
– यावल मतदार संघ : हेमराज चौधरी (एकूण मते १६८), नितीन चौधरी (विजयी- एकूण मते २६०)
– महिला राखीव मतदार संघ: देवकर छाया गुलाबराव (विजयी २३५), पाटील पूनम प्रशांत (विजयी २५७), पाटील सुनिता राजेंद्र (१९२), पाटील उषाबाई विश्वासराव (०),सूर्यवंशी मनीषा अनंतराव (१६४), ९ मते अवैध.
– अनु जाती जमाती : ब्रम्हे श्रावण (एकूण मते १६१), आ. संजय सावकारे (विजयी- २७६)
– वि.जा.भ.ज.वि.मा.प्र. : विजय पाटील (एकूण मते १७९), अरविंद देशमुख (विजयी- एकूण मते २५९)
– इ.मा.व : गोपाळ भंगाळे (एकूण मते २०७), पराग मोरे (विजयी- एकूण मते २३०)