जळगाव राजमुदार वृत्तसेवा | जागतिक योग दिनानिमित्त शिवाजी नगर भाजपा मंडळ क्र १ च्या वतीने पालिकेच्या शाळा क्र १ मध्ये योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात भूषण चौधरी, सुप्रिया लोहकर, सुमित चांदुरकर या योग शिक्षकांनी प्रशिक्षण दिले.
या कार्यक्रमास मंडळ अध्यक्ष रमेश जोगी, युवामोर्चा अध्यक्ष दिनेश पुरोहित, शांताराम गावंडे, संजय शिंपी, राजेंद्र मराठे, निलेश पवार, अनिल सोनावणे, मनोहर परदेशी, बंटी तिवारी, निशिकांत मोरे, डॉ चंद्रशेखर वाणी, दीपक तायडे, राजू भोई, शंभू जोगी, प्रभाकर तायडे आणि शिवाजी नगर शाखेचे स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.