जळगाव राजमुद्रा | शहरातील एसबीआय बँकेजवळी रस्त्यावर दोन गटात वाद निर्माण झाल्याने ह्या वादात थेट गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा क्रीडा संकुलाच्या समोरील एसबीआय बँकेच्या रस्त्यावर घटना घडल्याचे समजते आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री असलेले गिरीश महाजन यांचे संपर्क कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या काही अंतरावर ही घटना घडल्याने संपूर्ण जळगावात खळबळ उडाली आहे, नेमकं आज दूध संघाचे निकाल हाती आले असताना ही घटना घडल्याने यंत्रणा हाय -अलर्ट झाली आहे. मात्र गोळीबार कोणी केला ? नेमक्या किती गोळ्या झाडण्यात आल्या ? याबाबत योग्य तो तपास पोलीस करीत आहे.
दरम्यान, घटना घडल्याचा काही अंतरावरच जी. एस मैदानात गेल्या दोन दिवसापासून कोळी समाज आयोजित क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या उत्साहात या स्पर्धा सध्या पार पडत आहे. असे असताना दोन गटांमध्ये जोरदार वाद निर्माण झाल्याने गोळीबार करण्यात आला आहे.
घटनास्थळी जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी दाखल झाले असून पुढील चौकशी करण्यात येत आहे, झाडण्यात आलेल्या गोळ्यांचे पुराव्यांचा पोलीस शोध घेत आहे. नेमके हे दोन गट कोण ? कोणत्या कारणावरून वाद झाला ? हे देखील शहानिशा पोलीस करीत आहे,