मुंबई : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने डिप्लोमा ट्रेनी पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 211 पदांवर भरती केली जाणार आहे. या रिक्त पदासाठी ऑनलाइन अर्ज घेतले जात आहेत. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना PGCIL Recruitment च्या अधिकृत वेबसाइट careers.powergrid.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना तपासावी.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनने जारी केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया 09 डिसेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या रिक्त पदांसाठी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
असा करा ऑनलाइन अर्ज
- अर्ज करण्यासाठी सर्वात आधी careers.powergrid.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- वेबसाइटच्या होम पेजवर करिअरच्या लिंकवर क्लिक करा.
- यानंतर PGCIL Diploma Trainee Recruitment 2022 च्या लिंकवर क्लिक करा.
- आता Apply Online च्या ऑप्शनवर जा.
- त्यानंतर पुढील पेजवर मागितलेल्या डिटेल्सपूर्वी रजिस्ट्रेशन करा.
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर अॅप्लिकेशन अर्ज भरू शकता.
अर्ज भरण्यासाठी किती लागणार फी
PGCILने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, डिप्लोमा ट्रेनी पदासाठीची अर्ज प्रक्रिया फी जमा केल्यानंतरच पूर्ण मानली जाईल. या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना शुल्क म्हणून 300 रुपये जमा करावे लागतील. एससी, एसटी आणि माजी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. शुल्क ऑनलाइन भरता येईल.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
डिप्लोमा ट्रेनी पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल, सिव्हिल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगची पदवी असणे आवश्यक आहे. पात्रतेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहा.