राजमुद्रा वृत्तसेवा | प्रशांत किशोर यांनी कशी दिवसापूर्वी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असतांना आता दुसऱ्यांदा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले असून त्यांच्यात दिल्लीत बैठक सुरु आहे त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो, काय चर्चा होते याकडे राजकीय दिग्गजांचे लक्ष लागून आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला होता त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतात का ? त्यांची मोर्चेबांधणी कशी करता येईल शरद पवार या सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र आणू शकतात का ? या संदर्भात दोघांमधील राजकीय चर्चा झाल्याची चर्चा आहे. दरम्यान भाजप विरोधात निवडणुकीच्या आखाड्यात मात देणारा म्हणून प्रशांत किशोर यांचा चेहरा असून, त्यांनी भाजप विरोधात सरकार स्थापन करणाऱ्या शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय क्षेत्रात हि भेट महत्वाची मानली जात आहे. प्रशांत किशोर यांनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदीपंजाबात कॅप्टन अमरिंदर सिंघ, बिहारात नितीश कुमार तर, सन २०१९-२० मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेने बरोबर काम केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे राजकारण, निवडणूक जिंकण्याचे डावपेच याचा प्रशांत किशोर यांना चांगला अभ्यास आहे.