दोंडाईचा राजमुद्रा वृत्तसेवा | दोंडाईचा शहरात गेल्या एका महिन्यापासून पालिकेचच्या सर्व नळांना गाळयुक्त जंतूसईत दूषित पाणीपुरवठा होत आहे. याची तात्काळ चौकशी करून पालिकेने शहरवासियांना शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी मागणी शहर शिवसेना, युवासेना व महिला आघाडी तर्फे करण्यात आली आहे.
दरम्यान शुद्ध पाण्याचा पुरवठा पूर्णतः न केल्यास, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात येईल. याबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे साथीचे आजार वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे त्यामुळे सध्यस्थितीत होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्याची चौकशी करण्यात यावी आणि नागरिकांना लवकर शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी होत आहे. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका विजया मराठे, शहरप्रमुख सुनंदा पवार, लक्ष्मी ठाकूर, माधुरी चिंचोलीकर,कविता यादव, यांच्यासह युवासेनेचे तालुकाप्रमुख आकाश कोळी, शहरप्रमुख सागर पवार सेनेचे उपशहर प्रमुख विजय वाडीले, चुडामण बोरसे, राज ढोले, चेतन साबळे, निलेश विसावे यांनी केले.