जळगाव : जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी माजी मंत्री सुरेश जैन यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
माजी मंत्री सुरेश जैन यांना घरकुल घोटाळाप्रकरणी नियमित जामीन मिळाल्यानंतर ते शहरात दाखल झाले आहेत. त्यांच्या आगमनाने शिवसेना ठाकरे गटात चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सुरेश जैन यांच्यावर प्रेम करणारे विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या भेटीसाठी जात आहेत.
पालकमंत्री यांनी घेतली भेट
गुरुवारीच पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी देखील भेट घेत सुरेश जैन यांनी राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त केली होती. शुक्रवारी (दि. १६) दुपारी जळगाव शहराचे आ.सुरेश भोळे हे देखील सुरेश जैन यांच्या भेटीला पोहचले आहेत. जळगाव शहरातील सुरेश जैन यांच्या सत्तेला ब्रेक लावण्याचे काम आ.भोळे यांनी केले आहे.
आमदार भोळे यांनी लावला जैनांच्या सत्तेला ब्रेक
विधानसभा निवडणुकीत आ.भोळे यांनी जैन यांचा पराभव केला आहे. एकीकडे शिवसेनेचा शिंदे गट भाजप सोबत गेलेला असतांना सुरेश जैन मात्र ठाकरे गटात आहेत. याच पार्श्वभूमीवर आ. सुरेश भोळे यांनी सुरेश जैन यांची घेतलेली सदिच्छा भेट चर्चेचा विषय ठरला आहे.