जळगाव : समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी प्रत्येकाने नेहमीच मदतीचा हात दिला पाहिजे. संकटात असलेल्या गरजू व्यक्तीला केलेल्या मदतीमुळेच व्यक्ती मोठा होतो. दिव्यांग सेवा हीच ईश्वरी सेवा असून सामाजिक कार्याने प्रेरित डॉ. कमलाकर पाटील व माजी उपसभापती शितलताई पाटील यांनी घेतलेला प्रेरणादायी उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव येथे महात्मा गांधी उद्यानात दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मागील महिन्यात घेतलेल्या दिव्यांग स्वावलंबन शिबिरातील 120 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व युडीआयडी कार्ड वाटप करण्यात आलेत तसेच 120 दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचे फॉर्म भरून घेऊन त्यासाठी प्रस्ताव तयार केले . मागील महिन्यात घेतलेल्या शिबिरातील 700 विधवा, निराधार, परितक्त्या, वृद्धलाभार्थ्यांचे बँक पासबुक, आधारकार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे जमा केले आणि पंचायत समिती फंडातून अपंग बचत गटांना अर्थसहाय्य साठी धनादेश वाटप करण्यात आले.
पालकमंत्र्यांवर संघर्षगीताचे गायन
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षक संदीप पाटील यांनी केले. प्रास्ताविकात फुपणीचे माजी सरपंच डॉ. कमलाकर पाटील यांनी दिव्यांग बांधवांना दिव्यांग बांधवांसाठी व वृद्ध नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी करीत असलेल्या कार्याची माहिती देऊन प्रेरणादायी कार्यक्रमाविषयी माहिती विशद केली तर आभार पं. स.च्या माजी उपसभापती शितल पाटील यांनी मानले. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर संघर्ष यात्रे गीत तयार करून माजी उपसभापती शितल पाटील व त्यांची कन्या दिप्ती पाटील यांनी “तू चाल पुढे…… ” हे संघर्ष गीत गाऊन उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी कु. दिव्या ज्ञानेश्वर पाटील व बेबाताई पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नाना सोनवणे, युवा सेनेचे शिवराज पाटील, रमेशआप्पा पाटील, तुषार महाजन, गजानन सोनवणे, जितेंद्र पाटील , मार्केट कमिटीचे संचालक अनिल भोळे, पसर माजी पं. स. सदस्या जागृती चौधरी, मिलिंद चौधरी , विकाचे चेअरमन पंकज पाटील, विनोद टेलर माजी उपसभापती विजय नारखेडे, स्वप्निल परदेशी, सेवानिवृत्त डीवायएसपी पुंडलिक सपकाळे, दिलीप आगीवाल, निलेश वाघ, दिलीप जगताप यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, महिला व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.