जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव येथील शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान च्या वतीने सुप्रीम कॉलनी परिसरात कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या औषधांचे वाटप करण्यात आले. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौघुले तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हे विभागाचे दीपक राव यांच्या हस्ते या उपक्रमचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हिंदुराष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मोहन तिवारी, बजरंग दलाचे महानगर संयोजक राजेंद्र नन्नावरे, विठ्ठल पाटील, दिलीप सोनावणे, चंद्रकांत भापसे, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख गजानन माळी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल पाटील, अशोक शिंदे, सुशील इंगळे, गणेश शेटे, ऋषिकेश आढाव, अनिकेत गुगरे, निलेश राठोड आदी. उपस्थित होते.