पुणे : भाजपाचे जेष्ठ नेते तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकीची घटना घडली होती. या घटनेचा त्यांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसून आले. पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी चक्क फेसशिल्ड चेहऱ्यावर परिधान करीत कार्यक्रमात पोहचलले. फेसशिल्ड चेहऱ्यावर असलेले चंद्रकांत पाटील यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतांना दिसत आहे.
पिंपरी चिंचवड येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा होता. पुन्हा शाईफेकण्याची धमकी सोशल मीडियातून देण्यात आली होती. शाईफेकीच्या धमकीमुळं चंद्रकांत पाटील खबरदारी म्हणून फेसशिल्ड वापरू लागले. विकास लोलेंसह आणखी काही जणांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा शाईफेक होणार का, यावरची पोस्ट केली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतलं. विकास लोले हे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याची माहिती आहे.
पोलिसांकडून पत्रकारांचीही तपासणी
याआधी परभणीत चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर शाईफेक होऊ शकते, या भीतीनं पोलिसांनी पत्रकारांचीही तपासणी केली होती. कुणाच्या खिशात शाईचं पेन नाही ना, याच्या पडताळणीनंतरच पत्रकारांना पत्रकार परिषदेसाठी सोडण्यात आलं होतं.
डोळा थोडक्यात बचावला
याआधीच्या घटनेत चंद्रकांत पाटील यांच्या डोळ्यात शाई गेली होती. काही काळापूर्वी चंद्रकांत पाटील यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी डोळ्याचा कँसर झाला होता. त्यामुळं डोळा गोधळीसारखा शिवलेला आहे. शाईफेकीनंतर डोळ्यांच्या पापन्यांवर शाई चिपकली होती. डॉक्टरांनी ती क्लीन करून दिली. या प्रकारामुळे डोळा थोडक्यात वाचला, त्यामुळे डोळ्यांना इजा होऊ नये यासाठी फेसशिल्ड वापरत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.