जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | बी एच आर प्रकरणात जिल्ह्यासह राज्यात जोरात चर्चेला उधाणआले आहे. आता या प्रकरणी आर्थिकदृष्ट्या महत्वपूर्ण भूमिकेत असलेल्या एजंट यांची नेमकी भूमिका काय याचा शोध पोलीस घेत असून संबंधित एजंट पोलीस पथकाच्या रडारवर असल्याचे खात्रीदायक सांगण्यात आले आहे.
दरम्यान आर्थिक गुन्हे शाखे कडून कोणाच्या माध्यमातून हा मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे याचा शोध पथक घेत असून, पावती मॅचींग करण्यात एजंटचा मोठा वाटा असल्याचा संशय तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना असून गुन्हे शाखेच्या माध्यमातून लुबाडणूक व फसवणूक करणारे एजंट कोणते ? कोणत्या एजंटने ठेवीदारांची फसवणूक केली आहे याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचे संपूर्ण जाळे महाराष्ट्रात पसरल्याने यामध्ये अनेक दिग्गज नेते, राजकारणी अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच गुन्हे शाखेच्या पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाची खास दिशा बडवली असून काही एजंट जिल्ह्यातून फरार झाल्याचे सांगण्यात आले. बड्या कर्जदारांसोबत कमी किमतीत खरेदी करून त्या बड्या कर्ज दारांना संबंधित मालमत्ता त्यांचे कर्ज निरंक दाखवण्यात महत्वाचे काम एजंटच्या टीम ने केले असल्याचे समजते. त्यात प्रामुख्याने कागदोपत्री आर्थिक देवाण घेवाण करणारे एजंट देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातील गोपनीय माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली असल्याचे समजते, राज्यातील तथाकथित एजंट यांना ताब्यातघेण्याची मोहीम लवकरच सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.