मुंबई : सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स 2022-23 चा पुढील हप्ता आजपासून पाच दिवसांसाठी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आहे. सोन्याची इश्यू किंमत 5,409 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत सरकारच्या वतीने बॉण्ड्स जारी करते. विशेष बाब म्हणजे आरबीआयने जारी केलेल्या गोल्ड बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करण्याची ही शेवटची संधी आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी मार्चमध्येच संधी मिळेल. तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल, तर आजपासून 5 दिवसांची संधी आहे.
या गोल्ड बॉण्ड्सची खरेदी लहान वित्त बँका, पेमेंट बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका वगळून स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), नियुक्त पोस्ट ऑफिस आणि स्टॉक एक्सचेंज NSE आणि BSE द्वारे केली जाऊ शकते.
ऑनलाइन खरेदीदारांसाठी सवलत
भारत सरकारने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी सल्लामसलत करून, ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीने पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 ची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, अशा गुंतवणूकदारांसाठी सोन्याच्या रोख्यांची इश्यू किंमत 5,359 रुपये प्रति ग्रॅम सोन्यासाठी असेल.
गोल्ड बॉण्ड्स खरेदी करण्याची पुढील संधी
सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स (SGBs) 2022-23 सीरीज IV 06-10 मार्च 2023 दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी उघडतील.
गोल्ड बॉण्ड्सची मुदत
बॉण्ड्सची मुदत 5व्या वर्षानंतर मुदतपूर्व पूर्ततेसाठी पर्यायासह 8 वर्षांच्या कालावधीसाठी असेल, ज्या तारखेला व्याज देय असेल.
SGB मध्ये गुंतवणूक का करावी?
तज्ज्ञांच्या मते, फिजिकल गोल्ड किंवा डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा एसजीबीमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय मानला जातो. ही योजना भारत सरकारद्वारे राबविली जाते आणि RBI द्वारे नियंत्रित केली जाते. गुंतवणुकदारांना दर अर्ध्या वर्षी 2.50 टक्के दराने निश्चित दराने परतावा मिळतो.
गोल्ड बॉण्ड्सवर कर किती लागतो?
SGB चे कर आकारणीचे वेगवेगळे नियम आहेत. SGB कडून मिळणारा भांडवली नफा मुदतपूर्तीच्या वेळी करमुक्त असतो. तथापि, गुंतवणूकदार पाच वर्षांनंतर एसजीबीची मुदतपूर्व पूर्तता करू शकतात. तुम्ही पाच ते आठ वर्षांच्या दरम्यान SGB रिडीम केल्यास, नफा दीर्घकालीन भांडवली नफा मानला जातो. त्यावर इंडेक्सेशन लाभासह 20.8 टक्के (सेससह) कर आकारला जातो. गुंतवणुकदार सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स (SGBs) स्टॉक एक्स्चेंजवर खरेदी आणि विक्री करु शकतात. SGB तीन वर्षापूर्वी विकल्यास, भांडवली नफा गुंतवणूकदाराच्या उत्पन्नात जोडला जातो आणि लागू आयकर स्लॅबवर आधारित कर आकारला जातो.