मुंबई : सिंधुदुर्गाला लग्नाचं वऱ्हाड घेऊन गेलेल्या खासगी बसला कंटनेरनं पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील प्रवासी जखमी झाल्याची घटना मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ घडली.
सिंधुदुर्गला गेलेली बस शहापूर-वाशिंदला परतत होती. तेव्हा खोपोलीजवळ एका कंटेनरने बसला पाठीमागून धडक दिली. यावेळी बसमध्ये 35 प्रवासी होते. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चुरडा झाला. तसेच, काही तास मुंबई पुणे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
जखमींवर उपचार सुरू
बसमधील 22 प्रवासी जखमी आहेत. यातील 4 प्रवाशांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात नेले असून त्यातील एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक आहे. तर 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी असून त्यांच्यावर घटनास्थळी प्राथमिक उपचार केले आहेत. तर अन्य 6 जखमींवर खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.