मुंबई : देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. ओला ते ओकिनावापर्यंतच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची जोरदार खरेदी केली जात आहे. याशिवाय अनेक इलेक्ट्रिक बाइक्सही बाजारात उपलब्ध आहेत. पण तरीही ग्राहक स्प्लेंडर आणि रॉयल एनफिल्ड बुलेट सारख्या बाईकच्या इलेक्ट्रिक व्हर्जनची वाट पाहत आहेत. मात्र, बिहारमधील एक कंपनी या लोकप्रिय बाइक्सचे इलेक्ट्रिक व्हर्जन बनवत आहे आणि त्यांच्या वेबसाइटवर विकत आहे. या वेबसाइटवर इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. येथे तुम्ही रॉयल एनफील्ड बुलेट इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये देखील खरेदी करू शकता.
सिल्व्हलाइन नावाची ही कंपनी रॉयल एनफील्ड बुलेट सारख्या दिसणाऱ्या इलेक्ट्रिक बाइक्सची विक्री करत आहे. त्याला लव्ह प्लस असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे बाईक फक्त 2000 रुपयांमध्ये बुक करता येते. स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 72V/48AH बॅटरी देण्यात आली आहे. बाइकचा टॉप स्पीड 120 किलोमीटर प्रति तास आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे फुल चार्जमध्ये 150KM पर्यंत धावू शकते. बाईकची किंमत 1,51,999 रुपये आहे.
हिरो पॅशन प्रो चा इलेक्ट्रिक अवतार
हिरोच्या लोकप्रिय बाइक पॅशन प्रोचे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील आहे. त्याला अग्नी प्लस असे नाव देण्यात आले आहे. बाइकची किंमत 1,25,999 रुपये आहे, परंतु तुम्ही ती फक्त 2,000 रुपयांमध्ये बुक करू शकता. यात 72V/48AH ची बॅटरी आहे. बाइकचा टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रति तास आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे फुल चार्जमध्ये 150KM पर्यंत धावू शकते. बाईकची किंमत 1,51,999 रुपये आहे.
इलेक्ट्रिक दुचाकींची यादी मोठी
फक्त बुलेट आणि पॅशन प्रोच नाही तर यामाहा R15 देखील इथे इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये विकले जात आहे. याशिवाय इलेक्ट्रिक ऑटो आणि ई-रिक्षा देखील आहेत. कंपनीचे सर्वात स्वस्त मॉडेल 56 हजार रुपयांचे आहे. हे एक स्लो स्पीड मोपेड आहे, जे पूर्ण चार्ज करून 70 किमी चालते. पूर्ण चार्ज होण्यासाठी 2-3 तास लागतात.