(बोदवड राजमुद्रा वृत्तसेवा) भारतीय जनता पार्टी, बोदवड़ तालूका तर्फे जागतिक योग दिनानिमित्त बोदवड़ तालुक्यातील जनतेसाठी एक दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योगाचे तज्ञ मार्गदर्शक जगदीश खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराला सुरवात करण्यात आली. लोकांना योग शिक्षण देऊन योगाचे महत्व पटवून दिले. योग शिक्षक शेखरसिंग चौहान यांनी नागरिकांना प्राणायामाचे धडे देत महत्व सांगितले.
बोदवड़ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी शिबिरार्थीना मार्गदर्शन केले तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस अमोल देशमुख यांनी जनतेला योग दिनाचे महत्व सांगत पूर्ण योग शिबिराचे यशस्वी व्यवस्थापन केले. या योग शिबिराचा बोदवड़ तालुक्यातील अनेक योग साधकांनी लाभ घेतला.
एक दिवसीय योग शिबिर यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनंता कुलकर्णी, भा.ज.पा जळगाव जिल्हा कोषाध्यक्ष अनिल खंडेलवाल, भा.ज.पा बोदवड़ तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटिल, भा.ज.पा तालुका सरचिटणीस अमोल देशमुख, राजेंद्र डापसे, भा.ज.पा शहरध्यक्ष नरेश आहूजा, शहरउपाध्यक्ष धनराज सुतार, नाडगांव गण प्रमुख सुधीर पाटिल, चरणसिंग पाटिल, भा.ज.पा चित्रपट कामगार आघाडी तालुकाध्यक्ष उमेश गुरव व तसेच भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. याबाबतची माहीती भारतीय जनता पार्टीचे सोशल मिडिया प्रमुख रोहित अग्रवाल यांनी राजमुद्राला कळवली.