मुंबई: आज या वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. यामागील कारण म्हणजे खगोलीय घटना आहे. प्रकाश आणि अंधाराचा वेळ देखील आपल्या स्थानावर अवलंबून असला तरी, आज तुमचा दिवस 10 तास 41 मिनिटांचा आणि रात्र 13 तास 19 मिनिटांची असेल. मात्र, काय आहेत या मागील कारणं ते जाणून घेऊया.
22 डिसेंबर 2022 रोजी, पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना सूर्य मकर राशीच्या उष्ण कटिबंधावर उभा असेल. यामुळे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असेल. मध्य भारताबद्दल बोलायचे झाले तर तिथे सूर्योदय सकाळी 7.05 वाजता होईल. सूर्यास्त संध्याकाळी 5.46 वाजता होईल. म्हणजे दिवसाची वेळ 10 तास 41 मिनिटे असेल. आणि रात्रीची वेळ 13 तास 19 मिनिटे.
नेमका काय आहे नैसर्गिक बदल?
या दिवशी सूर्यप्रकाशाचा कोन 23 अंश 26 मिनिटे 17 सेकंद दक्षिणेकडे असेल. पुढील वर्षी 21 मार्च रोजी सूर्य विषुववृत्तावर असेल, त्यानंतर दिवस आणि रात्र समान वेळ असेल. त्याला इंग्रजीत Winter Solstice म्हणतात. Solstice हा लॅटिन शब्द आहे जो Solstim वरून आला आहे. लॅटिन शब्द सोलचा अर्थ सूर्य असा होतो तर सेस्टेअरचा अर्थ स्थिर राहणे. या दोन शब्दांना एकत्र करून संक्रांती हा शब्द तयार झाला आहे, ज्याचा अर्थ सूर्याचे उभे राहणे असा होतो. या नैसर्गिक बदलामुळे 22 डिसेंबरला सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते.
या देशांमध्ये उन्हाळ्याची सुरुवात
इतर ग्रहांप्रमाणे, पृथ्वी देखील 23.5 अंशांवर झुकलेली आहे. झुकलेल्या अक्षावर पृथ्वीच्या फिरण्यामुळे सूर्याची किरणे एका ठिकाणी जास्त आणि दुसऱ्या ठिकाणी कमी पडतात. हिवाळ्यात संक्रांतीच्या काळात दक्षिण गोलार्धात सूर्यप्रकाश जास्त असतो. त्याच वेळी, उत्तर गोलार्धात कमी सूर्यप्रकाश असतो. या कारणास्तव, या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धात जास्त काळ राहतो, यामुळे येथे दिवस मोठा असतो. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये आजपासून उन्हाळा सुरू होत आहे.